नवी दिल्ली - दिल्लीला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीमध्ये हा दुसरा भूकंप झाला आहे. सुदैवाने यामुळे कोणतेही नुकसान वा जीवीतहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.
आज झालेल्या भुकंपाचे केंद्रस्थान हे ईशान्य दिल्लीच्या वझीरपूरमध्ये, जमीनीखाली पाच किलोमीटरवर होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ मॅग्निट्यूड होती. राष्ट्रीय भूंकपशास्त्र केंद्राचे प्रमुख जे. एल. गौतम यांनी ही माहिती दिली.