मुंबई - गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबईकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सकाळपासूनच गणपतीच्या मोठ-मोठ्या मिरवणुकी शहरातून होत समुद्र किनाऱ्यावर जमल्या आहेत. मुंबईत आज भाविकांची रेलचेल असून जुहू चौपाटीवर हजारोंच्या संख्येने भाविक जमले आहेत.
बाप्पांना निरोप देण्याकरिता जुहू चौपाटीवर भाविकांची गर्दी; गणेशभक्तांचा उत्साह शिगेला - जुहू चौपाटी
गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबईकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सकाळपासूनच गणपतीच्या मोठ-मोठ्या मिरवणुकी शहरातून होत समुद्र किनाऱ्यावर जमल्या आहेत. मुंबईत आज भाविकांची रेलचेल असून जुहू चौपाटीवर हजारोंच्या संख्येने भाविक जमले आहेत.
मुंबईच्या चौपाटीवर सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. शहराच्या विविध भागातून बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका चौपाटीकडे येत आहेत. ढोल-ताशांचा गजरात बाप्पांच्या काही मिरवणुक ह्या जुहू चौपाटीवर पोहोचल्या असून, भाविक आपापल्या मंडळांबरोबर बाप्पांचे रुप डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने उपस्थित आहेत. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी...
हेही वाचा - धर्माधिकारी प्रतिष्ठान गिरगाव चौपाटीवर जमा करतंय निर्माल्य; बनविणार गांडूळ खत