अमरावती (तिरुपती) - दक्षिण भारतातील प्रसिद्ध देवस्थान व्यंकटेश्वरा मंदिर (तिरुपती बालाजी) खुले करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे दोन महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद आहे. 8 जूनपासून मंदिर प्रशासनाच्या सदस्यांकडून पुढील दोन तीन दिवस रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यावेळी सुरक्षेची सर्व खबरदारी घेवून मंदिर प्रशासनातील सदस्यांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे.
तिरुपती बालाजी मंदिर खुले करण्याआधी प्रशासनाची 8 जूनपासून रंगीत तालीम - तिरुपती बालाजी मंदिर बातमी
मंदिर सुरू करण्याआधी सर्व सुरक्षेची खातरजमा झाल्यानंतरच मंदिर भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच ऑनलाईन तिकिट उपलब्ध करुन देण्यात येतील.
आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवस प्रशासनातील सदस्यांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे. तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली.
मंदिर सुरू करण्याआधी सर्व सुरक्षेची खातरजमा झाल्यानंतरच मंदिर भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच ऑनलाईन तिकिट उपलब्ध करुन देण्यात येतील. विनातिकिट प्रवेश करणाऱ्यांची सर्व माहितीची नोंद करून घेतल्यानंतरच आत प्रवेश देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.