नवी दिल्ली -श्री कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र, यंदा सुरू असलेल्या कोरोनामुळे जन्माष्टमी अनेक ठिकाणी साजरी होत नाही. मात्र, कृष्ण भक्तांसाठी इस्कॉनने (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) जन्माष्टमी व्हर्च्युअल साजरी करण्याचे ठरवले आहे.
इस्कॉनकडून यंदा कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार 'व्हर्च्युअल' - कृष्ण जन्माष्टमी बातमी
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम व्हर्च्युअली होणार असल्याची माहिती इस्कॉनचे उपाध्यक्ष्य चलपती दास यांनी दिली.
इस्कॉन बंगळूरुचे उपाध्यक्ष्य चलपती दास म्हणाले, श्री कृष्ण जन्माष्टमीवेळी इस्कॉनच्या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, श्री कृष्णांचे बालपण गेलेल्या वृदांवन येथील मंदिरात भाविकांची सर्वाधिक संख्या असते. जन्माष्ठमीच्या दिवशी दिवसभर येथे कृष्ण मूर्तीचा अभिषेक केला जातो.
मात्र, सध्या सुरू असलेल्या कोरोनाकाळामुळे सामाजिक अंतर राखले जावे यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाची व्हर्च्युअल सोय करण्यात आली आहे. पहाटे नौका विहार झाल्यानंतर कृष्णमूर्तीला पंच गव्य, पंचामृत, पाणी, फळांचा रस, चंदनाचे पाणी याने अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर पुष्पवृष्टी करण्यात येईल. त्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम होईल, अशी माहिती चलपती यांनी दिली.