उदयपूर- देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. अशा परिस्थितीत नागरिक आपल्या घरांमध्येच असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहे. इतकेच नव्हे, तर उदयपूरमधील नेहमी गजबजलेले असणारे जगदीश मंदिरही पूर्णपणे ओस पडले आहे.
कोरोनाचा परिणाम; ४०० वर्षात पहिल्यांदाच ओस पडले उदयूपरमधील प्रसिद्ध मंदिर - उदयूपरमधील प्रसिद्ध मंदिर
एरवी हे मंदिर नेहमीच भक्तांनी गजबजलेले असते. मात्र, लॉकडाऊनदरम्यान हे मंदिर ४०० वर्षात पहिल्यांदाच इतके ओस पडले आहे. अशा परिस्थिती मंदिरातील काही पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच देवाची पूजा केली जात आहे. या मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे, की भक्तांच्या विनाच देवाची पूजा केली जात आहे.
![कोरोनाचा परिणाम; ४०० वर्षात पहिल्यांदाच ओस पडले उदयूपरमधील प्रसिद्ध मंदिर ४०० वर्षात पहिल्यांदाच ओस पडले उदयूपरमधील प्रसिद्ध मंदिर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6811087-281-6811087-1587017073655.jpg)
एरवी हे मंदिर नेहमीच भक्तांनी गजबजलेले असते. मात्र, लॉकडाऊनदरम्यान हे मंदिर ४०० वर्षात पहिल्यांदाच इतके ओस पडले आहे. अशा परिस्थिती मंदिरातील काही पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच देवाची पूजा केली जात आहे. या मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे, की भक्तांच्या विनाच देवाची पूजा केली जात आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून नेहमी जगदीश मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हिराबाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले, की ४५ वर्षात मी पहिल्यांदाच मंदिर इतके ओस पडलेले पाहिले. ४५ वर्षांपासून मी रोज इथे दर्शनासाठी येते. मात्र, कधीही असे वाटले नाही, की असा दिवसही पाहावा लागेल.