पुरी- ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांची रथयात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. जवळपास आठवडाभर जगन्नाथ यात्रेचा महोत्सव असतो. महोत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात. भगवान श्रीकृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या पूजेनंतर जगात प्रसिद्ध असलेली रथयात्रा काढण्यात येते.
आज जगन्नाथ रथ यात्रेचा पहिला दिवस आहे. जगन्नाथांच्या रथ यात्रेला सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. जवळपास १० लाख संख्येच्या संख्येत उपस्थित असलेले भक्त भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे ३ वेगवेगळे रथ ओढतात. भाविक जवळपास ३ किलोमीटर लांब असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत रथ ओढतात.
भगवान जगन्नाथांची रथ यात्रा ओडिशा राज्यात श्री जगन्नाथांचे जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर पुरी शहरात समुद्रकिनारी बांधलेले आहे. भगवान जगन्नाथाच्या (जगाचा स्वामी) मंदिर चारधाम मंदिरांपैकी एक आहे. मंदिर वैष्णव सांप्रदायाचे असून भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. जगन्नाथांचे वास्तव्य असल्याने या गावाला 'जगन्नाथपूरी' असेही नाव आहे. मंदिरातून निघणारी वार्षिक रथ यात्रा जगप्रसिद्ध आहे. मंदिरातील मुख्य ३ देवता भगवान जगन्नाथ, जगन्नाथाचे मोठे भाऊ बलभद्र (बलराम) आणि बहिण सुभद्रा यांची वेगवेगळ्या सजवलेल्या रथांमध्ये यात्रा काढली जाते.
एक आठवडा चालणाऱ्या या महोत्सवात जवळपास दीड ते दोन लाख भाविक येण्याची शक्यता आहे. राज्याचे पर्यटन मंत्री ज्योति प्रकाश यांनी पाणिग्रही महोत्सवाची घोषणा केली. 'मला ओडिशात जगन्नाथ रथ यात्रेची घोषणा करताना आनंद होत आहे. चक्रीवादळीनंतर झालेल्या नुकसानीतून सावरताना अवघ्या २ महिन्यात ४ ते १२ जुलैपर्यंत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, याचा मला गर्व आहे. वादळानंतर विस्कळीत झालेली वीज, पाणी आणि हॉटेलसारख्या आधारभूत सुविधा पुरवल्या आहेत,' असे ते म्हणाले.
'राज्य अजूनही चक्रीवादळातून सावरले नाही. परंतु, जगन्नाथ रथ यात्रेसाठी आम्ही तयार आहोत. महोत्सवासाठी दीड ते दोन लाख भक्त येण्याची शक्यता आहे,' असे पर्यटन, क्रीडा आणि युवा सेवा सचिव विश्व कुमार देव म्हणाले.