लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी खळबळजनक विधान केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांनी मुक्या प्राण्यांची कुर्बानी देऊ नये. कोणाला कुर्बानी देण्याची इतकीच इच्छा असेल, तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी असे वक्तव्य गुर्जर यांनी केले आहे.
श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये बरेच सण-समारंभ असतात. मात्र, लोकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सण साजरे करताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कोरोना काळात लोक मंदिर आणि मशिदीमध्ये न जाता प्रार्थना करत होते, त्याचप्रमाणे आताही खबरदारी बाळगायला हवी, असे ते म्हणाले.
कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य.. मांस खाल्ल्याने होतो कोरोनाचा प्रसार..
मांसामधून कोरोना प्रसार होत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, की लोकांनी मांसाहार टाळावा. तसेच, मद्यपान केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्यामुळे मद्यपानही टाळायला हवे, असे ते म्हणाले.
कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या..
सनातन धर्मामध्येही पुरातन काळात बळी दिला जात होता. मात्र आता त्याजागी नारळ फोडला जातो. मुस्लिम धर्मीयांनीही अशा प्रकारचा मार्ग निवडायला हवा. मुक्या प्राण्यांचा बळी देणे त्यांनी टाळले पाहिजे. जर कोणाला बळी देण्याची एवढीच हौस असेल, तर आपल्या मुलांचा बळी त्याने द्यावा. बकरीचा बळी देणाऱ्याला पुढील जन्मातही बकरीच व्हावे लागेल, आणि त्याचाही असाच बळी जाईल असे मत गुर्जर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :राम मंदिर उभारले जाताच देश कोरोनामुक्त होईल; भाजप खासदाराची मुक्ताफळे..