नवी दिल्ली : बजरंगी भाईजान चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सलमानला इंटरनेटची ताकद काय असते हे दाखवून देतो. एका व्हायरल व्हिडिओमुळे बजरंगीची केवढी मदत होते, हे आपण पाहिलेच आहे. इंटरनेट आणि व्हायरल व्हिडिओच्या याच ताकदीची झलक आता दिल्लीमधील एका दाम्पत्यालाही पहायला मिळाली. दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी जेव्हा मालवीय नगरमध्ये असणाऱ्या या ढाब्यावर पोहोचले, तेव्हा तिथे शेकडोंच्या संख्येत लोक उपस्थित होते. कित्येक लोक या वृद्ध दाम्पत्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी आले होते, तर काही लोक त्यांना मदत करण्यासाठी. यासोबतच, या ढाब्यावर खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही बरीच होती.
गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे ढाबा..
कांता प्रसाद, त्यांची पत्नी बादामी देवी आणि त्यांची दोन मुले मालवीय नगरमध्ये राहतात. गेल्या तीस वर्षांपासून कांता प्रसाद हा ढाबा चालवत आहेत. रोज सकाळी सहाच्या सुमारास कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी ढाब्यावर पोहोचतात. ते आणि त्यांची पत्नी मिळून स्वयंपाक करत असल्यामुळे ढाब्यावरील अन्नालाही घरगुती चव असते. साधीच डाळ, भात, चपाती, भाजी अशा प्रकारचे पदार्थ याठिकाणी मिळतात. घरापासून लांब राहणाऱ्या लोकांसाठी 'घरचं' जेवण मिळण्यासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजे बाबा का ढाबा.
लॉकडाऊननंतर ग्राहकांचे येणे झाले बंद..