महाराष्ट्र

maharashtra

सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करू - काँग्रेसचे आश्वासन

By

Published : Apr 2, 2019, 11:43 PM IST

Updated : Apr 3, 2019, 12:15 AM IST

मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नागरिकांचे आधिकार संतुलत करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यास करून काही कायद्यांमध्ये बदल करू असे सांगितले आहे. तसेच, देशद्रोहाचे कलम १२४ अ आणि AFSPA रद्द करू असे सांगितले. या दोन्हीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी

नवी दिल्ली - सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचे कलम १२४ अ रद्द करू असे आश्वासन मंगळवारी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. ‘जन की आवाज’ असे जाहीरनाम्याला नाव दिले आहे. तसेच, ‘हम निभाएंगे’ असे जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन देण्यात आलेले आहे. देशद्रोहाचे कलम १२४ अ आणि AFSPA रद्द करू असे सांगण्यात आले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला. मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नागरिकांचे आधिकार संतुलत करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यास करून काही कायद्यांमध्ये बदल करू असे सांगितले आहे. तसेच, देशद्रोहाचे कलम १२४ अ आणि AFSPA रद्द करू असे सांगितले. या दोन्हीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला आदींसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

कलम १२४ (अ) नुसार एखाद्या व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला चालवला जातो. मात्र, सध्या १२४ (अ) कलमाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. नंतर आलेल्या काही कलमामुळे १२४ (अ)चे महत्व कमी झाले आहे, असे म्हणत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात १२४ (अ) रद्द करू असे आश्वासन दिले आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यावर १२४ (अ) च्या अन्वये सध्या खटला सुरू आहे.

काय आहे कलम १२४ (अ)?

भारतात कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकारविरोधात कोणीही, शब्दांनी, लिखित अथवा वाचिक, तसेच, चिन्हांनी अथवा दृश्याच्या आधारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, अथवा सरकारचा अवमान करत असेल किंवा सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा असंतोष निर्माण करत असेल, तर त्यास आजीवन कारावास, ज्यात आर्थिक दंडाचाही समावेश असेल, किंवा तीन वर्षांचा कारावास व आर्थिक दंड किंवा आर्थिक दंड, ही शिक्षा केली जावी. हेच देशद्रोहाचे कलम १२४ अ आणि AFSPA रद्द करू असे काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितले आहे.

Last Updated : Apr 3, 2019, 12:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details