महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

‘लाज त्यांना नाही तुम्हाला वाटली पाहिजे’, नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

'मला नामदारांना विचारायचं आहे की, तुम्ही तुमच्या गुरुंना कशाबद्दल ओरडत आहात ? कारण त्यांनी काँग्रेसच्या मनात जे आहे ते उघड केले ? कुटुंबाचे रहस्य त्यांनी सार्वजनिक केले म्हणून ? अहो नामदार, लाज तर तुम्हाला वाटायला हवी’, असा टोला नरेंद्र मोदींनी यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

By

Published : May 14, 2019, 8:47 AM IST

Updated : May 14, 2019, 11:30 AM IST

नरेंद्र मोदी

भटिंडा - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमधील फतेहगढ साहिब येथे 'सॅम पित्रोदा यांनी १९८४ दंगल प्रकरणी चुकीचे वक्तव्य केले. या वक्तव्याची त्यांना लाज वाटली पाहिजे,' असे म्हटले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'लाज त्यांना नाही, तुम्हाला वाटली पाहिजे,' असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर हल्ला चढवला. ते पंजाबमधील भटिंडा येथील सभेत बोलत होते.


'१९८४ च्या दंगल घडून गेली. जे झाले ते झाले. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता का बोलत आहेत? मागील पाच वर्षात त्यांनी काय केले हे देशाला सांगावे,' असे वक्तव्य पित्रोदा यांनी केले होते. यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'सॅम पित्रोदा चुकीचे बोलले. त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी जाहीर माफी मागावी,' असे राहुल यांनी म्हटले होते. यावरून राहुल आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधत ‘लाज त्यांना नाही तुम्हाला वाटली पाहिजे’, असे मोदींनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेत या माफीचा काहीच फायदा नसल्याचे सांगितले आहे. ‘नामदार आपल्या गुरुंना लाज वाटली पाहिजे असे सांगत आहात. मला नामदारांना विचारायचं आहे की, तुम्ही तुमच्या गुरुंना कशाबद्दल ओरडत आहात ? कारण त्यांनी काँग्रेसच्या मनात जे आहे ते उघड केले ? कुटुंबाचे रहस्य त्यांनी सार्वजनिक केले म्हणून ? अहो नामदार, लाज तर तुम्हाला वाटायला हवी’, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

हे पक्षाचे मत नाही - काँग्रेसचे जाहीर पत्रक

‘१९८४ दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. याविरोधात सॅम पित्रोदा अथवा कोणीही व्यक्त केलेले मत किंवा वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचे मत नाही. १९८४ दंगल पीडितांना आणि २००२ गुजरात दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे’, असे पत्रक याआधी काँग्रेसने जारी केले होते.

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?

१९८४ च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून आले होते असा आरोप भाजपने केला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सॅम पित्रोदा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. १९८४ ची दंगल घडून गेली. जे झाले ते झाले. १९८४ च्या दंगलीत पंतप्रधान कार्यालयाकडून काही आदेश देण्यात आले होते, असे मला अजिबात वाटत नाही. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता का बोलत आहेत? मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केले हे देशाला सांगावे.

Last Updated : May 14, 2019, 11:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details