नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान झाले. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९१८ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. देशात सरासरी मतदान ६०.२१ टक्के झाले.
७ व्या टप्प्यासाठी पंजाब, उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी १३; पश्चिम बंगालमधील ९, बिहार आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशात ४, झारखंडमध्ये ३ आणि चंदीगढमध्ये एका जागेसाठी मतदान झाले.
Live Updates :
०८.३०- सायंकाळी आठ वाजेपर्यंत सातव्या टप्प्यातील मतदान : सरासरी मतदान ६२.८७% . बिहार - ५३.३६% हिमाचल प्रदेश -६९.७३%, मध्य प्रदेश- ७१.४४%, पंजाब - ६२.४५%, उत्तर प्रदेश- ५७.८६%, पश्चिम बंगाल- ७३.५१%, झारखंड - ७१.१६%, चंदीगड - ६३.५७%
०६.२० - सायंकाळी सहा वाजेपर्यंत सातव्या टप्प्यातील स्थिती : देशातील सरासरी मतदान ६०.२१% . बिहार - ४९.९२% हिमाचल प्रदेश -६६.१८%, मध्य प्रदेश- ६९.३८%, पंजाब - ५८.८१%, उत्तर प्रदेश- ५४.३७%, पश्चिम बंगाल- ७३.०५%, झारखंड - ७०.०५%, चंदीगढ - ६३.५७%
०५.२५ - पश्चिम बंगालमधील नऊ लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची तक्रार भाजपने बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्ताकडे केली आहे. एकूण ४१७ तक्रारीपैकी २२७ तक्रारी सोडवण्यात आल्या असून १९० तक्रारी सोडवणे बाकी असल्याचे भाजपने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
०५.१०- सायंकाळी ५ वाजेपर्यंत सातव्या टप्प्यातील स्थिती : एकूण मतदान ५३.०३% . बिहार - ४६.७५% हिमाचल प्रदेश -५७.४३%, मध्य प्रदेश- ५९.७५%, पंजाब - ५०.४९%, उत्तर प्रदेश- ४७.२१%, पश्चिम बंगाल- ६४.८७%, झारखंड - ६६.६४%, चंदीगढ - ५१.१८%,
५.०० - आज सकाळी मतदान सुरु झाल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आणि सीआरपीएफचे जवान आम्हाला त्रास देत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. राज्यात असा प्रकार यापुर्वी कधी घडला नसल्याचेही त्या म्हणाल्या.
४.३० - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
३.४० - दुपारी तीनवाजेपर्यंत झालेले मतदान बिहार - ४६.६६ हिमाचल प्रदेश - ४९.४३, मध्य प्रदेश- ५७.२७, पंजाब - ४८.१८, उत्तर प्रदेश- ४६.०७, पश्चिम बंगाल- ६३.५८, झारखंड - ६४.८१, चंदीगढ - ५०.५४.
३:१५ PM - पाटणा येथे सयामी जुळ्या भगिनी सबा आणि फराह यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. या दोघीजणींची डोकी जन्मतःच जोडलेली असून त्यांनी मतदार म्हणून स्वतंत्रपणे मतदान केले.
३:०० PM - इंदूरमध्ये ३७ अंधांनी मतदानाचा हक्क बजावला.
२:४० PM - वाराणसीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मतदान केले.
२:२० PM - ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
२:०० PM - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर बोलताना त्यांनी 'नवज्योतसिंग सिद्धूला मी त्याच्या लहानपणापासून ओळखतो. लोकांच्या काही महत्त्वाकांक्षा असू शकतात. तो सध्या माझ्या पदावर (मुख्यमंत्री) डोळा ठेवून आहे,' असे म्हटले.
१:४० PM - 'माझ्या अंगरक्षकांनी काहीही केलेले नाही. मी मतदान करून निघत असताना माझ्यावर हल्ला झाला. एका माझ्या छायाचित्रकाराने माझ्या गाडीची काच तोडली. हा मला ठार करण्याचा कट होता. मी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे,' असे तेज प्रताप यादव यांनी सांगितले.
१:३० PM - आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून यादव यांच्या अंगरक्षकांकडून कॅमेरामनला बेदम मारहाण. गाडीची काच फुटली असून तेज प्रताप यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
१:१० PM - भाजपमधून नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि पाटणा साहिब येथील उमेदवार शत्रूघ्न सिन्हा यांनी पाटणा येथे मतदान केले.
१२:५० PM - हिमाचल प्रदेशात मनाली मतदारसंघात वराने लग्नानंतर संपूर्ण परिवारासह मतदान केले.
१२:३५ PM - उत्तर प्रदेशात गाझीपूर येथे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मनोज सिन्हा यांनी मतदान केले.
१२:२० PM - पश्चिम बंगालमध्ये डायमंड हार्बर येथील भाजप उमेदवार निरंजन रॉय यांच्या गाडीची तोडफोड