पंतप्रधान मोदी खोटे बोलतात, ममतांच्या काळात 'सीपीएम'सारखाच अत्याचार होतोय; राहुल गांधींचा हल्लाबोल
मोदींनी कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच एकीकडे मोदी खोटे बोलतात तर दुसरीकडे ममता बॅनर्जी खोटी आश्वासने देतात. सीपीएमच्या काळात जे अत्याचार होत होते, तेच आता ममता सरकारच्या काळात होत असल्याचे राहुल म्हणाले. संपूर्ण बंगालला केवळ एक व्यक्ती चालवते. काय संपूर्ण प्रदेशाला केवळ एका व्यक्तीला चालवू द्यायला पाहिजे?, असा सवालही राहुल यांनी यावेळी उपस्थित केला. वाचा सविस्तर
भाजपकडून ११ उमेदवारांची चौथी यादी जाहीर
यादीमध्ये ११ लोकांचा समावेश आहे. तेलंगणातील ११, उत्तर प्रदेशातील ३ आणि केरळ व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी घोषणा करण्यात आली आहे. कैरानामधून माजी खासदार हुकुम सिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांचे तिकीट कापण्यात आले असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर
मी नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला घाबरत नाही - राहुल गांधी
देशातील युवक बेरोजगार आहे. या ५६ इंचाच्या छाती वाल्यांनी युवकाना रोजगार देण्याचे वचन दिले होते. मात्र त्यांनी ५ वर्षापर्यंत फ्लॉप सिनेमा चालवला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ते बिहारच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आपल्या जनभावना रॅलीला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला फैलावर घेतले. मी नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला घाबरत नाही. मी केवळ सत्याचा पक्षधर आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर
'देशामध्ये होणारे दहशतवादी हल्ले पाकिस्तान प्रणीत असतात की नाही? - भाजपचा काँग्रेसला सवाल
नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यावरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्नांचा मारा केल्यानंतर भाजपने आज पलटवार केला आहे. देशामध्ये होणारे दहशतवादी हल्ले पाकिस्तान प्रणीत असतात की नाही? हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा उलट सवालच भाजपने केला आहे. भाजपच्या या प्रश्नानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..
बिहार एनडीए उमेदवारांची यादी जाहीर; पाटण्यातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद लढवणार निवडणूक
शुक्रवारी महाआघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटप केल्यानंतर आज भाजपने बिहार येथे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पाटण्यातून निवडणूक लढवणार आहेत तर, गिरीराज सिंह बेगुसराय येथून निवडणूक लढवणार आहेत.वाचा सविस्तर..