नवी दिल्ली - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुषमा स्वराज ह्या भारतीय संस्कृतीच्या दूतावास होत्या. याबरोबरच त्या उत्तम प्रशासक आणि संवेदनशिल नेत्या होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारत दु:खात बुडाला आहे, अशा भावना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केल्या.
सुषमा स्वराज भारतीय संस्कृतीच्या दूतावास होत्या - लोकसभा अध्यक्ष - सुषमा स्वराज निधन
सुषमा स्वराज ह्या भारतीय संस्कृतीच्या दूतावास होत्या. याबरोबरच त्या उत्तम प्रशासक आणि संवेदनशिल नेत्या होत्या - लोकसभा अध्यक्ष
सुषमा स्वराज यांना प्रत्येकाच्या अडचणी समजत होत्या. त्या सोडवत त्यांनी लोकांची सेवा केली. आज आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत, असे बिर्ला म्हणाले.
सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.