नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जीनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे म्हटले होते. सर्वच माध्यमांवर ही बाब 'हायलाईट' झाल्यानंतर आता त्यांनी आपल्याकडून चुकून असे म्हटले गेल्याचा खुलासा केला आहे. मौलाना आझाद यांच्या नावाऐवजी चुकून मोहम्मद अली जीना बोलून गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मला मौलाना आझाद म्हणायचे होते, मोहम्मद जीना चुकून म्हणालो - शॉटगनचा खुलासा - shatrughan sinha
शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती. काँग्रेस हा जीना यांचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात त्यांचाही सहभाग आहे, असे सिन्हा यांनी म्हटले होते. ही बाब 'हायलाईट' झाल्यानंतर मौलाना आझाद यांच्या नावाऐवजी चुकून मोहम्मद अली जीना बोलून गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती. काँग्रेस हा जीना यांचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात त्यांचाही सहभाग आहे, असे सिन्हा यांनी म्हटले होते. 'काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारले खायला दिल्यासारखे वाटते, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते. ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे बोलत होते.