मायावती अडचणीत, मुस्लिमांना मते मागितल्याने निवडणूक आयोगाने मागवला अहवाल - deoband
या भाषणात मायावतींनी थेट मुसलमानांना संबोधित करत आघाडीला मतदान करावे, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.
मायावती
नवी दिल्ली - 'मुस्लीम समाजाने सावध राहावे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. यासाठी सप-बसप आणि इतर पक्षांच्या आघाडीलाच (महाआघाडी) मतदान करा,' अशा शब्दांत बसप अध्यक्ष मायावतींनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद येथे मुस्लीम समाजाला थेट मते मागितली होती. ही सप-बसप आणि रालोदची पहिलीच संयुक्त प्रचारसभा होती. मायावतींच्या भाषणामुळे वादात अडकली आहे.