महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चौथ्या टप्प्यात 'या' मतदार संघांमध्ये जोरदार टक्कर; 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात देशभरातील ८ राज्यांमध्ये मोठे नेते रिंगणात आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Apr 28, 2019, 5:27 PM IST

नवी दिल्ली -देश आता लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशभरातील ८ राज्यांमध्ये २९ एप्रिल म्हणजेच सोमवारी मतदान होईल. यामध्ये ७१ लोकसभा मतदार संघांचा सामावेश असून एकूण ९४३ उमेदवार रिंगणात आहेत. चौथ्या टप्प्यात कोणते दिग्गज नेते निवडणूक लढत आहेत, त्यावर एक नजर टाकू.


महाराष्ट्र -
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात हाराष्ट्रातील १७ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रासाठी हा शेवटचा टप्पा असून येथे एकूण ३२३ उमेदवार मैदानात आहेत. या टप्प्यात मोठ्या प्रमाणात दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघांवर लागले आहे.

  • नंदूरबार -
    हीना गावित आणि के. सी. पडावी

महाराष्ट्राच्या नंदूरबार मतदार संघामध्ये खासदार हीना गावित रिंगणात आहेत. तर, काँग्रेसने के. सी. पडावी यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये सरळ टक्कर असून हीना गावित यांनी ५१ टक्के मतदान घेऊन मागच्या निवडणुकांमध्ये विजय संपादन केले होते. त्यावेळी ९.५७ टक्के मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांचा पराभव झाला होता.

  • धुळे -
    सुभाष भामरे आणि कुणाल पाटील

धुळ्यामध्ये खासदार सुभाष भामरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपले अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकिटावर आमदार कुणाल (बाबा) रोहिदास पाटील मैदानात आहेत. खासदार विरुद्ध आमदार लढत असल्यामुळे कोणाच्या बाजूने जनता कौल देणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • नाशिक -
    हेमंत गोडसे आणि समीर भुडबळ

नाशिकमधून माजी खासदार समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप-शिवसेना आघाडीचे आणि नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे रिंगणात आहेत. मागच्या निवडणुकांमध्ये छगन भुजबळांनी येथून निवडणूक लढवली होती. मात्र, हेमंत गोडसे यांनी ५२ टक्के मतदान घेऊन विजय मिळवला होता. या मतदार संघातून पुन्हा निवडून येण्यासाठी गोडसे धडपड करत आहेत. तर, समीर भुजबळ हिसकावलेली जागा मिळवण्यासाठी रिंगणात आहेत.

  • पालघर -
    राजेंद्र गावित आणि बळीराम जाधव

पालघर लोसभा मतदार संघातून शिवसेसनेच्या तिकिटावर खासदार राजेंद्र गावित निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर बहुजन विकास आघाडीचे आव्हान आहे. बहुजन विकास आघाडीच्या तिकिटावर बळीराम जाधव रिंगणात आहेत. २००९च्या लोसकभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या चिंतामण वनगा यांना हरवले होते. या निवडणुकीमध्ये गावित यांच्यावर आपले पद सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे.

  • कल्याण -
    श्रीकांत शिंदे आणि बाबाजी पाटील

कल्याण लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या वतिने रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात बाबाजी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे आव्हान आहे. मागच्या निवडणुकांमध्ये त्यांना मनसेने टक्कर दिली होती. यावेळी मनसे निवडणूकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे बाबाजी पाटील यांचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

  • उत्तर मुंबई -
    उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी

उर्मिला मातोंडकर या काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील ही निवडणूक रंगतदार झाली आहे. त्यांच्या विरोधात खासदार गोपाळ शेट्टी रिंगणात आहेत. मागच्या वेळी काँग्रेस नेते संजय निरुपम मोठ्या अंतराने निवडणूक हरले होते. मातोंडकर यांचा बदला घेण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहण्यासारखे झाले आहे.

  • उत्तर पश्चिम मुंबई -
    संजय निरुपम आणि गजानन किर्तीकर

उत्तर पश्चिम मुंबईतून यावेळी काँग्रेस नेते संजय निरुपम निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर खासदार गजानन किर्तीकर रिंगणात आहेत. या मतदार संघातून मनसेच्या तिकिटावर मागच्या वर्षी अभिनेते महेश मांजरेकरांनी निवडणूक लढवली होती. मात्र, मनसे रिंगणात नसल्यामुळे संजय निरुपम यांना यश मिळेल का हे पाहण्यासारखे झाले आहे.

  • मुंबई उत्तर मध्य -
    प्रिया दत्त आणि पुनम महाजन

या लोकसभा मतदार संघातून अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी आणि संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्त निवडणूक लढत आहेत. येथे त्यांच्याविरोधा खासदार पुनम महाजन रिंगणात आहेत. त्यामुळे प्रिया दत्तसाठी मोठे आव्हान आहे. पुनम महाजन आपला मतदार संघ वाचवण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत. तर, प्रिया दत्त या निवडणुकीमधून राजकारणात प्रवेश करत आहेत.

  • दक्षिण मध्य मुंबई -
    राहुल शेवाळे आणि एकनाथ खडसे

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदार राहुल शेवाळे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार एकनाथ गायकवाड मैदानात आहेत. राहुल शेवाळे यावेळी आपला मतदार संघ वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. तर खडसे मतदार संघाची गादी परत मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे येथील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

  • दक्षिण मुंबई -
    मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेस नेते मिलींद देवरा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात खासदार अरविंद सावंत रिंगणात आहेत. २०१४च्या निवडणुकांमध्ये सावंत यांनी या मतदार संघातून विजय मिळवला होता. त्यावेळी देवरा यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. यावेळी पुन्हा दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

  • मावळ -
    पार्थ पवार आणि श्रीरंग बरणे

मावाळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या विरोधात खासदार श्रीरंग बरणे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव पार्थ पवारसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.


राजस्थान -
राजस्थान येथे १३ लोकसभा मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात मदतान होणार आहे. येथे एकूण ११५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी काही असे लोकसभा मतदार संघ आहेत. ज्यामध्ये राजघराण्याशी संबंधीत निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे राजस्थानात देशाचे विशेष लक्ष लागून आहे.
राजस्थानच्या जोधपूर लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री अशोक गलहोत यांचे पुत्र वैभव गहलोत रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे गजेंद्र शेखावत रिंगणात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात अपयश आले होते. यानंतर लोकसभा निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निकालांचा काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे झाले आहे.

  • राजसमंद -

राजसमंद या लोकसभा निवडणुक मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर राजकुमारी दिया कुमारी निवडणूक लढत आहेत. त्या रासमंदचे राजे सवई मानसिंह यांच्या कुळातील आहेत. म्हणजेच जयपूरच्या शेवटच्या राज्याच्या कन्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे देवकिनंदन काका मैदानात आहेत.

  • झालावाड-बारन -

या लोकसभा मतदार संघातू काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांचे भाऊ दुष्यंत सिंह भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ते धौलपूरच्या शेवटचे महाराज राणा हेमंत सिंह यांचे पुत्र आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अशोक कुमार मैदानात आहेत.


उत्तर प्रदेश -
महाराष्ट्रासारखेच उत्तरप्रदेशच्या १३ जागांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात देशातील सर्वात जास्त म्हणजेच एकूण ८० लोकसभेच्या जागा असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष येथे लागले आहे. येथे बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल या पक्षांनी आघाडी केली आहे. त्यांची ही आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे मानले जात आहे.

  • उन्नाव -

उत्तर प्रदेशच्या उन्नाव लोकसभा मतदार संघामधून खासदार साक्षी महाराज रिंगणात आहेत. ते भाजपच्या तिकिटावर यावेळीही निवडणूक लढवत असून वादग्रस्त विधान करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. त्यांच्याविरोध सपा-बसपा आघाडीच्या अरुण शुल्कांचे आव्हान आहे.

  • कनौज -

कनौज लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव निवडणूक लढत आहेत. मागच्या वेळी अत्यंत कमी मतांनी मोदी लाटेतही विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्यासमोर भाजपच्या सुब्रत पाठकचे आव्हान आहे. सपा आणि बसपा दोन्ही पक्षांनी आघाडी केल्यामुळे भाजपसाठी यावेळीही काट्याची टक्कर ठरणार आहे.


बिहार -
बिहारमध्ये चाथ्याटप्प्यात ५ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. येथे एकूण ६६ उमेदवार निवडणूक लढत आहेत. येथे भाजपने जनता दल युनायटेज आणि लोक जनशक्ती पार्टीसोबत आघाडी केली आहे. सध्या बिहारमध्ये याच एनडीए पक्षांचे सरकार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत.

  • बेगुसराय -

बिहारच्या बेगुसराय मतदार संघामध्ये देशाचे लक्ष लागून आहे. येथून केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैया कुमार उभे आहेत. तर लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचे तनवीर हसन मैदानात आहे. येथे या तिन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर आहे. गिरिराज सिंह आपले मंत्रीपद वाचवण्यासाठी रिंगणात आहेत. मागच्या वेळी अगदी थोड्या मतांनी हरलेले तनवीर सिंह या मतदार संघावत ताबामिळवण्यासाठी लढत आहेत.

  • पश्चिम बंगाल -

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात ८ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. येथे लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपसोबत सरळ टक्कर आहे. निवडणुकांच्या सुरुवातीला त्यांनी देशभरातील भाजप विरोधी पक्षांना एकत्र मंचकावर आणून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर निकालामध्ये याचा काय परिणाम होणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

  • आसनसोल -

आसनसोल येथे देशभराचे लक्ष लागून आहे. कारण या मतदार संघातून पश्चिम बंगालचे दोन प्रसिद्ध कलाकार एकमेकांच्या विरोधात रिंगणात आहेत. भाजपच्या तिकिटावरुन गायक आणि खासदार बाबुल सुप्रियो निवडणूक लढत आहेत. तर तृणमूलच्या तिकिटावर प्रसिद्ध अभिनेत्री मुन मुन सेन मैदानात आहेत. दोघामध्ये काट्याची टक्कर असल्याचे म्हटले जात आहे. सुप्रियो दुसऱ्यांदा ही जागा जिंकण्यासाठी मैदानात आहेत. त्यांना रोखण्यासाठी तृणमूल ने सेन यांना उभे केले आहे. या दोघांनीही निवडणूकीत संपूर्ण ताकद लावली आहे.

मध्यप्रदेश -
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यामध्ये मध्यप्रदेशच्या ६ लोकसभा मतदार संघामध्येही निवडणूक होणार आहे. येथे लोकसभेच्या एकूण २९ जागा आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये भाजपा येथे मोठा धक्का बसला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकात येथून कशे निकाल येतील, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • छिंदवाडा -

छिंदवाडा येथून मुख्यमंत्री कमल नाथ यांचे पुत्र नकुल नाथ रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे नथनशाह कवरेती निवडणूक लढत आहेत. मुख्यमंत्री पुत्र मैदानात असल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदार संघात लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details