महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मोदी कोड ऑफ कंडक्ट'वर सुरू आहेत निवडणुका, पंतप्रधान मोदींना क्लिन चीट मिळाल्यावर काँग्रेसचे शरसंधान

'देशाच्या पंतप्रधानांना कलम ३२४चे उल्लंघन केल्यानंतरही कोणतीही अडचण आली आली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, यामुळे अत्यंत निराश झालो आहे. आता 'आदर्श आचार संहिता' राहिली नसून ती 'मोदी आचार संहिता' बनली आहे,' असे सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी, रणदीप सुरजेवाला

By

Published : May 1, 2019, 1:13 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील वर्धा येथे एक एप्रिलला केलेल्या भाषणात आचार संहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. याच्या चौकशीत निवडणूक आयोगाने मोदींना 'क्लिन चीट' दिली आहे. यावर संताप व्यक्त करत काँग्रेसने या निवडणुका 'निवडणूक आचारसंहिते'नुसार (MCC - Model Code of Condut) चाललेल्या नसून 'मोदी आचार संहिते'नुसार (Modi Code of Conduct) सुरू असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या आशयाचे ट्विट केले आहे.


'देशाच्या पंतप्रधानांना कलम ३२४चे उल्लंघन केल्यानंतरही कोणतीही अडचण आली आली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, यामुळे अत्यंत निराश झालो आहे. आता 'आदर्श आचार संहिता' राहिली नसून ती 'मोदी आचार संहिता' बनली आहे. देशात २ कायदे अस्तित्वात असू शकत नाहीत. एक मोदींसाठी आणि दुसरा इतर सर्वांसाठी,' असे सुरजेवाला यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.


बसप प्रमुख मायावती यांनीही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनीही 'उत्तर प्रदेशासह ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार आहे, तेथे शासकीय संस्थांचा दुरुपयोग सुरू आहे. मोदींना माहिती आहे की, सर्व प्रकारची कारस्थाने केल्यानंतरही त्यांची सत्ता निरंकुश सुरू आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, तेथे अनैतिकता, हिंसा आणि सप-बसपसह विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनाही सीबीआय, ईडी, आयटी आदींच्या माध्यमातून जरब बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदींनी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४० आमदार फोडून ममता सरकार पाडण्याची खुलेआम धमकी दिली, ही राजकीय कटाची चरमसीमा आहे. त्यांना बंगाल आणि देशातील जनता माफ करणार नाही,' असा हल्ला मायावती यांनी केला आहे.


पंतप्रधान मोदींनी वर्धा येथे केलेल्या भाषणात राहुल गांधींनी केरळातील वायनाड येथून निवडणूक लढवण्यावर टीका केली होती. 'तेथील अल्पसंख्य समाजाच्या मतांचा फायदा मिळवण्यासाठी राहुल यांनी या मतदार संघाची निवड केली आहे,' असे मोदींनी म्हटले होते. या बाबतीत निवडणूक आयोगाने हा आचारसंहिता भंग नसल्याचे सांगत मोदींना क्लिन चीट दिली होती. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यानेही मोदींनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details