नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील ५२ टक्के नोकऱ्या गेल्याची शक्यता सीआयआयचे सीईओ स्नॅप पोल यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे ५२ टक्के नोकऱ्या गेल्याची शक्यता - कोरोनाच्या संकटामुळे ५२ टक्के नोकऱ्या गेल्याची शक्यता
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील ५२ टक्के नोकऱ्या गेल्याची शक्यता सीआयआयचे सीईओ स्नॅप पोल यांनी व्यक्त केली आहे.
एका ऑनलाइन सर्वेक्षणात सुमारे 200 प्रमुख कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लॉकडाऊनच्या स्थितीमुळे अर्थव्यवस्था अ़चणीत येण्याची शक्यता आहे. तसेच विविध क्षेत्रातील नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. स्नॅप पोलच्या यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसचा उद्रेक आणि त्यानंतरच्या देशव्यापी लॉकडाऊनने बहुतांश कंपन्यांच्या महसूलात घट झाली आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर उद्योगासाठी वित्तीय प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यातही वर्तवली आहे.