महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संघर्ष जगण्यासाठीचा : कुटुंबाचा भार खांद्यावर घेत ओढतोय 'गाडा', सांगा कसं जगायचं...? - बैलगाडी प्रवास

मूळचा मध्य प्रदेशातील महू गावचा रहिवासी असलेला राहुल याच्याकडे दोन बैल होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी एक बैल विकण्याची वेळ त्याच्यावर आली.

bull car
कुटुंबाचा भार खांद्यावर घेत चालवतोय 'गाडा'

By

Published : May 13, 2020, 1:54 PM IST

इंदौर (मध्य प्रदेश) - सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांच्या प्रवासादरम्यानची आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एक व्यक्ती एकाच बैलाच्या सहाय्याने स्वत:च बैलगाडी ओढतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, कामगार चालतच आपल्या घरी जात असल्याचेही आपण पाहत आहोतच.

मन हेलावून टाकणारे हे चित्र इंदौर बायपास येथील आहे. यात हे मजूर कुटुंब आपल्या घरी बैलगाडीने परतत आहे. मात्र, एकच बैल असल्याने दुसऱ्या बाजूला त्या कुटुंबातील व्यक्ती स्वत:च बैलगाडी ओढत आहे. या बैलगाडीत त्याचे कुटुंब बसले असून रखरखत्या उन्हात जगण्यासाठीचा त्यांचा हा संघर्ष सुरू आहे.

कुटुंबाचा भार खांद्यावर घेत चालवतोय 'गाडा'

मूळचा मध्य प्रदेशातील महू गावचा रहिवासी असलेला राहुल याच्याकडे दोन बैल होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी एक बैल विकण्याची वेळ त्याच्यावर आली. त्यामुळे उरलेल्या एका बैलाच्या मदतीने तो आपला गाडा गावच्या दिशेने घेऊन जात आहे.

विशेष म्हणजे राहुलच्या बैलाला केवळ त्याच्या मूळ किंमतीच्या एक तृतीयांश किमतीलाच विकावे लागले. सामान्य परिस्थितीत बैलाचे त्याला कमीतकमी 15 हजार रुपये मिळाले असते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात राहुलला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हतबल असल्यामुळे त्याला तो बैल केवळ 5 हजार रुपयांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसमुळे सतत लॉकडाऊनमध्ये वाढ केली जात आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बंद असून अनेक मजूर वर्ग कामाविनाच आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे हे सर्व मजूर आपल्या मूळ गावी निघाले आहेत. कुणी चालत तर कुणी आपल्या कुटुंबाचा भार खांद्यावर घेत त्यांनी जगण्यासाठीचा प्रवास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details