नवी दिल्ली -करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १४ एप्रिलला हा लॉकडाऊन संपत आहे. मात्र, त्यानंतर हा लॉकडाऊन उठणार की तसात पुढेही चालू राहणार या बाबत कोणताही निर्णय झाला नाही. भारतातील कोरोनाचा फैलावही नियंत्रणात आला नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमावस्था आहे. आज (बुधवार) सर्वपक्षीय नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये लॉकडाऊन पुर्णपणे उठविणे शक्य नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार नाही, पंतप्रधान मोदी - कोरोना लॉकडाऊन
लॉकडाऊन पूर्णपणे उठविणे शक्य नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केेले.
मात्र, पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनीही याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी १४ तारखेनंतर पूर्णपणे लॉकडाऊन हटवणार नसल्याचे सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच करोनाच्या आधीचे आणि नंतरचे आयुष्य सारखे नसणार असल्याचेही मोदी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय, काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, बीएसपी नेता सतीश यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित होते.