महाराष्ट्र

maharashtra

भगवान जगन्नाथांचे 'चंदन जत्रा', 'अक्षय तृतीया' उत्सव साजरे होणार; मात्र लॉकडाऊनचे नियम पाळत

By

Published : Apr 25, 2020, 5:34 PM IST

भगवान जगन्नाथ यांचा 'चंदन जत्रा' आणि 'अक्षय तृतीया' उत्सव रविवारी ओडिशाच्या पुरी येथील मंदिर परिसरात होणार आहे, असे गजपती महाराज आणि दिव्यसिंह देव यांनी सांगितले.

चंदन जत्रा
चंदन जत्रा

भुवनेश्वर (ओडिशा) - भगवान जगन्नाथ यांचा 'चंदन जत्रा' आणि 'अक्षय तृतीया' उत्सव रविवारी ओडिशाच्या पुरी येथील मंदिर परिसरात होणार आहे, असे गजपती महाराज आणि दिव्यसिंह देव यांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्येही हा उत्सव साजरा होणार आहे.

गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्यासमवेत शुक्रवारी मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.

गुरुजींच्या (शंकराचार्य) सल्ल्यानुसार 'अक्षय तृतीया' आणि 'चंदन जत्रा' या दोन्ही गोष्टी मंदिराच्या आवारात करण्याचे ठरविले गेले आहे. मंदिराची परंपरा कायम ठेवली पाहिजे आणि शतकानुशतके करण्यात येत असलेल्या जुन्या विधी आपण थांबवू शकत नाही, असे देव यांनी पत्रकारांना सांगितले.

निवडक पुरोहित आणि पूजक यांच्यामार्फत हे विधी पार पाडले जातील. परंतु, मंदिर आवारात भाविकांना परवानगी दिली जाणार नाही. लॉकडाऊनची स्थिती पाहता मंदिर प्रशासन धार्मिक संस्थेच्या आवाराबाहेर कोणतेही कार्य करणार नाही, असे गजपती महाराजांनी पूर्वीच सांगितले होते, असे देव म्हणाले.

गजपती महाराजांनी सांगितल्यानुसार आणि लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिराच्या आत आणि बाहेरील धार्मिक कार्यक्रमांना मनाई आहे. 22 मार्च रोजी ओडिशामध्ये लॉकडाउन लागू केल्यापासून 12 व्या शतकातील हे जगन्नाथाचे प्रसिद्ध मंदिर भाविकांसाठी बंद आहे. भगवान जगन्नाथाचा हा सर्वात जास्त काळ 44 दिवस चालणारा उत्सव आहे, असे जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details