महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात ३ मे नंतरही दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला, केंद्र सरकारची घोषणा

३ मे नंतर देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला

लॉकडाऊन
लॉकडाऊन

By

Published : May 1, 2020, 6:25 PM IST

Updated : May 1, 2020, 7:48 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ३ मे नंतर देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील कोरोनाचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे. या काळात सरकारने नव्याने नियमावली लागू केली आहे. ग्रीन झोन, रेड झोन, आणि ऑरेंज झोन असे जिल्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार काही प्रमाणात सुटही मिळणार आहे. ३ मे ला लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. मात्र, त्याआधीच ४ मे पासून १७ मे पर्यंत तिसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

सायंकाळी ७ पासून सकाळी ७ पर्यंत तिन्ही झोनमध्ये अनावश्यक कारणांसाठी प्रवास आणि घराबाहेर निघण्यावर निर्बंध आहेत, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात आता तिसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. देशामध्ये सर्वात प्रथम २४ मार्चला २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, १४ एप्रिलला लॉकडाऊन संपायच्या आत दुसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दुसऱ्या वेळी जाहीर केलेला लॉकडाऊन ३ मे ला संपणार होता, मात्र, आता ४ मे पासून १७ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून आणि समिक्षा करूनच निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारने पत्रकात स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

कसा असेल लॉकडाऊन?

  • रेड झोन (हॉटस्पॉट), ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये देशभरातील जिल्ह्यांची विभागणी करण्यात येईल.
  • लॉकडाऊन दरम्यान रेड झोनमध्ये असेलल्या जिल्ह्यांना सवलती मिळणार नाहीत.
  • जिल्ह्यांच्या वर्गवारीनुसार सूट दिली जाईल. निर्णय घेण्यासाठी गृहविभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना काही प्रमाणात सूट दिली जाईल, असे गृहविभागाने सांगितले आहे.
  • तरीही देशभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रतिबंध काही काळासाठी कायम ठेवले जातील.
  • हवाई, रेल्वे, मेट्रो आणि आंतरराज्य प्रवासावरील बंदी कायम असेल.
  • शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक आणि ट्रेनिंग, कोचिंग इन्स्टिट्यूट, सेवा क्षेत्र ज्यात हॉटेल्स आणि रेस्तरॉंचा समावेश होतो, लोक जमतील अशी स्थळे उदा. सिनेमा हॉल्स, मॉल, जिम आणि स्पोर्टस कॉम्प्लेक्सेस यावर बंदी कायम असेल.
  • सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर प्रकारच्या ठिकाणी जेथे लोक जमू शकतात त्यावर बंदी असेल. मंदीर, मशिद, चर्च, गुरुद्वारा या प्रमाणेच इतर धार्मिक ठिकाणांवर जमण्यास बंदी राहणार आहे.
  • गृहविभागाने मान्यता दिलेल्या काही खास कारणांसाठीच हवाई, रेल्वे आणि वाहतुकीला परवानगी दिली जाईल.
  • रेड झोन म्हणजे कोरोना हॉटस्पॉट. ज्या जिल्ह्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत, तो जिल्हा रेड झोन समजला जाईल.
  • ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्याना लॉकडाऊनपासून काही प्रमाणात सूट मिळणार
  • कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये याबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे
  • शून्य कोरोनाग्रस्त किंवा मागील २१ दिवसांपासून एकही रुग्ण सापडला नसलेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये असतील
  • ज्या जिल्ह्यांना ग्रीन किंवा रेड घोषित केले नसलीत ते ऑरेंज झोन समजले जातील
Last Updated : May 1, 2020, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details