कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे, १५ जूनला संपणारा हा लॉकडाऊन आता ३० जूनला संपणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
सध्या सुरू असलेला लॉकडाऊन हा ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. आता लागू असलेले निर्बंध लॉकडाऊन संपेपर्यंत लागू असणार आहे. लग्नसमारंभ किंवा अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना यापूर्वी केवळ १० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती, ही मर्यादा २५ लोकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. बाकी नियम सारखेच असणार आहेत, अशी माहिती ममतांनी दिली.