तिरुवनंतपूरम - त्रिश्शूर पूरम हा केरळ राज्यामधील एक लोकप्रिय धार्मिक महोत्सव आहे. हा महोत्सव दरवर्षी त्रिश्शूर पूरमच्या कुंडल माणिक्यम मंदिरामध्ये भरवला जातो. मात्र, यावर्षी कोरोना संकटात हा उत्सव साजरा होणार नसल्याची चिन्हे आहेत. यातच लॉकडाऊनच्या काळात एका व्यक्तीने कुडाल मानिक्यम मंदिराचे एक आकर्षक चित्र तयार केले आहे.
रतीश उन्नी असे मंदिराचे लघुचित्र तयार करणाऱया व्यक्तीचे नाव आहे. ते गांधीग्राम येथील रहिवासी आहेत. कुंडल माणिक्यम मंदिरातील सर्व उत्सव आणि भव्यता लहानपणापासूनच प्रत्येक वर्षी पाहत आलेले आहेत. उत्सावाची लघू प्रतिकृती तयार करण्याची त्यांची इच्छा होती. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी त्यावर काम करण्यास सुरवात केली असून एक भाग पूर्ण केला आहे.