नवी दिल्ली - आज सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊनबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दिल्लीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीत लॉकडाऊनचे नियम शिथिल करणार - केजरीवाल - कोरोना अपडेट दिल्ली
केंद्राने लॉकडाऊनबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना दिल्लीकरांच्या फायद्याच्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढले तरी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
केंद्राने रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार राज्याची विभागणी करून लॉकडाऊनच्या नियमामध्ये शिथिलता आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक सुरू करणे आणि सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यू न लावणे याबाबत केंद्र सरकारकडे मागणी केली होती. मात्र, केंद्राने त्यांना परवानगी नाकारली. इतकेच नाहीतर स्थानिक बाजारपेठा सुरू करताना देखील प्रमाणात दुकाने सुरू करावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.
केंद्राने लॉकडाऊनबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना दिल्लीकरांच्या फायद्याच्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढले तरी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच केंद्राची मार्गदर्शक तत्वे अर्थव्यवस्थेला चालना देतील, असेही केजरीवाल म्हणाले. तसेच या काळात योग्य काळजी न घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती केंद्राने व्यक्त केली आहे. मात्र, त्याचा सामना करण्यासाठी दिल्लीची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.