नवी दिल्ली - पाकिस्तानने हाफिझ सईद विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असले तरी त्यावर भारताचा मुळीच विश्वास नाही. पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जमाल-उल-दवाचा म्होरक्या हाफिझ सईदवर दहशतवादाचे आरोप ठेऊन त्याच्या अटकेची खात्री दिली आहे. पण, हा सर्व डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. पाकिस्तानचा दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचा देखावा करत असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकचा दहशतवाद्यांवर कारवाईचा देखावा, दाऊद कुठे आहे ते सर्वांनाच ठाऊक आहे - परराष्ट्र मंत्रालय - pakistan
'आता दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणी रहस्य राहिलेला नाही. पाकिस्तानने दाऊदला भारताच्या हवाली करावे. मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचे आता जगजाहीर आहे. आताच्या हाफिझ सईद विरोधातील दिखाऊ कारवाईवर भारताचा मुळीच विश्वास नाही.' असे रवीश कुमार म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालय
'भारताला दहशतवादमुक्त वातावरण आणि पाकिस्तानसोबत त्यावर आधारित शांततेचे संबध हवे आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशातून चालणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी अजूनपर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत. अशा वरवरच्या कारवाईने काही होणार नाही,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यानी म्हटले आहे. साधारण ३ महिन्यांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या पथकाला हाफिज सईदची चौकशी करू देण्यास नकार दिला होता.