नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून जनता दलाने (यु) चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये चिराग पासवान हे दिवंगत वडील रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर शुट करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी ते रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये चिराग पासवान वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत आहेत. तर यावेळी भाषणाच्या काही ओळी विसरल्यानंतर पुन्हा शूट करण्यास सांगत आहेत. तसेच त्यांच्या आजू-बाजूला कॅमेरामन आणि इतर काही सहकारी असल्याचे दिसत आहे. रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर शूट करताना चिराग पासवान हसत असल्याचंही दिसते. या व्हिडिओवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर चिराग पासवान यांनी आणखी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
चिराग पासवान यांचे स्पष्टीकरण -