महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा : एनडीएला खिंडार, नितिश कुमारांचे नेतृत्व नाकारत एलजेपी निवडणुकीच्या रिंगणात - chirag paswan

लोकजनशक्ती पार्टी बिहार निवडणूक स्वबळावर लढणार आहे. एलजेपी संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमधील आपला विजय निश्चित आहे, असे बैठकीनंतर चिराग पासवान म्हणाले.

चिराग पासवान
चिराग पासवान

By

Published : Oct 4, 2020, 7:02 PM IST

Updated : Oct 4, 2020, 9:20 PM IST

बिहार -बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यातच लोकजनशक्ती पार्टी बिहार निवडणूक स्वबळावर लढणार आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वैचारिक मतभेत असल्याचे कारण देत पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.

पक्षाच्या संसदीय बोर्डाची बैठक शनिवारी होणार होती. मात्र, रामविलास पासवान यांची प्रकृती अचानक खालावल्याने बैठक तहकूब करण्यात आली. काल रात्री उशिरा रामविलास पासवान यांचे हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. एलजेपीने नितिश कुमारांचे नेतृत्व नाकारले आहे.

एनडीएतून जरी बाहेर पडत असलो तरी गरज पडली तर भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा प्रस्ताव मंजूर केला. निवडणुकीनंतर एलजेपी आणि भाजपचे सरकार स्थापन होईल, त्यामध्ये नितीशकुमार यांची भूमिका नसल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बिहारमध्येही केंद्राच्या धर्तीवर भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करावे, असा निर्णय घेण्यात आला.

बिहारमधील आपला विजय निश्चित आहे, असे बैठकीनंतर चिराग पासवान म्हणाले. एलजेपी प्रवक्ता अशरफ अन्सारी यांच्या मते एलजेपी आणि भाजपमध्ये कटुता नाही. निवडणुकीच्या निकालानंतर एलजेपीचे आमदार मणिपूरच्या धर्तीवर भाजपला पाठिंबा देतील. मणिपूरमध्ये भाजप आणि एलजेपी यांच्यात युती नव्हती. मात्र, मणिपूरमधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि एलजेपीने सरकार स्थापन केले होते.

Last Updated : Oct 4, 2020, 9:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details