चंदीगड -गुरुग्राम येथील आर्टेमिस रूग्णालयात गाईच्या नसांचा वापर करून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सौदी अरेबियातील हूर नावाच्या एका वर्षाच्या मुलीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
चौदा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर हूरची प्रकृती स्थिर असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. हूरच्या शरीरातील पित्त नलिकांचा विकास न झाल्याने तिच्या यकृतामध्ये बिघाड झाला होता. सौदी अरेबियातील तज्ज्ञांना तिच्यावर उपचार करणे अशक्य झाल्याने तिला भारतात पाठवण्यात आले.