महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विदारक! चिखलात रुतलेले ट्रॅक्टर काढताना शेतकऱ्याचा मृत्यू, बघा दुर्घटनेचा VIDEO - आंध्र प्रदेश ट्रॅक्टर दुर्घटना

सर्व शेतकऱ्यांनी धक्का मारून सुद्धा ट्रॅक्टर चिखलातून बाहेर निघत नव्हते. त्यानंतर चिखल बाजूला करून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टर उलटून यामध्ये संजीव यांचा मृत्यू झाला. यावेळी शेतातीलच कोणीतरी मोबाईलवर व्हिडिओ बनवत होते. त्यामध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे.

andhra pradesh farmer died  live video of tractor overturned andhra pradesh  आंध्र प्रदेश ट्रॅक्टर दुर्घटना  आंध्र प्रदेश ट्रॅक्टर दुर्घटनेचा व्हिडिओ
VIDEO : चिखलात रुतलेले ट्रॅक्टर काढताना शेतकऱ्याचा मृत्यू, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

By

Published : Aug 11, 2020, 1:41 PM IST

Updated : Aug 11, 2020, 2:43 PM IST

अमरावती (आंध्र प्रदेश) - कडपा जिल्ह्यातील चिन्ना वेंतुर्ला येथे भातशेतीत काम करताना ट्रॅक्टर उलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. चिखलामध्ये रुतलेले ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली असून संजीव कर्णा (३०), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

VIDEO : चिखलात रुतलेले ट्रॅक्टर काढताना शेतकऱ्याचा मृत्यू, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

सध्या भात लावणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे संजीव हे वेंतुर्ला येथे भातलावणीसाठी ट्रॅक्टरने चिखल करत होते. यावेळी ट्रॅक्टरची चाके चिखलात खोलवर रुतली. त्यामुळे ट्रॅक्टर वळविण्यात अडचण निर्माण झाली. सर्व शेतकऱ्यांनी धक्का मारून सुद्धा ट्रॅक्टर चिखलातून बाहेर निघत नव्हते. त्यानंतर चिखल बाजूला सारून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टर उलटून यामध्ये संजीव यांचा मृत्यू झाला. यावेळी शेतातीलच कोणीतरी मोबाईलवर व्हिडिओ बनवत होते. त्यामध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे.

Last Updated : Aug 11, 2020, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details