कर्नाटक :चंडिका दुर्गा परमेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. हे मंदिर शिवमोगा येथे आहे.
LIVE : महाराष्ट्रासह देशभरातील शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात... - indian navratri
![LIVE : महाराष्ट्रासह देशभरातील शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात... navratri in india](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9205611-thumbnail-3x2-delhi.jpg)
14:16 October 17
कर्नाटक : चंडिका दुर्गा परमेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवास सुरुवात
13:15 October 17
नाशिकच्या कालिकामाता मंदिरात प्रवेशबंदी... फक्त धार्मिक कार्यक्रम होणार
नाशिक- शहरातील कालिकामाता मंदिरात भक्तांना प्रवेशबंदी आहे. यंदा फक्त धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
13:07 October 17
आसाम : कोरोनाच्या नियमांचे पालन करत गुवाहटीतील कामाख्या मंदिरात दर्शन सुरू झाले आहे.
आसाम : कोरोनाच्या नियमांचे पालन करत गुवाहटीतील कामाख्या मंदिरात दर्शन सुरू झाले आहे.
10:50 October 17
अमरावतीच्या अंबाबाई आणि एरवीरा आईच्या मंदिरात शुकशुकाट.. दर्शन बंद असल्याने नवरात्रीतही मंदिरं ओस
अमरावतीच्या अंबाबाई आणि एरविरा आईच्या मंदिरात यंदा शांतता पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे भाविकांची गर्दी मंदावल्याचे चित्र आहे.
10:17 October 17
कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिरातून 'लाइव्ह' दर्शन
यंदा कोरोनामुळे नवरात्रीत महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहे. अंबाबाईच्या मंदिरातून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
09:55 October 17
कर्नाटक : म्हैसुरमधील नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उपस्थिती लावली
कर्नाटकातील म्हैसुरमध्ये पार पडणाऱया नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उपस्थिती लावली.
09:53 October 17
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील काली मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील काली मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. गोरखपूर हा विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लोकसभेचा मतदारसंघ होता.
09:47 October 17
लुधियाणाऱ्या जागराव येथील दुर्गा माता मंदिरात दर्शनाला सुरुवात
लुधियाणाऱ्या जागराव येथील दुर्गा माता मंदिरात दर्शनाला सुरुवात झाली आहे.
09:04 October 17
उत्तरप्रदेशातील बलरामपूर मंदिरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते आरती
उत्तरप्रदेशातील बलरामपूर मंदिरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते आरती सोहळा संपन्न झाला. जागराव येथे हे दुर्गेचे मंदिर आहे.
08:22 October 17
जम्मू काश्मीरमध्ये वैष्णदेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
जम्मू काश्मीरमध्ये वैष्णदेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. यंदा कोरोनामुळे दिवसभरात फक्त 7000 लोकांना मंदिरात प्रवेश देण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे.
08:05 October 17
दिल्लीतील आदिशक्ती 'मॉं झंडेवाली'च्या मंदिरात पहाटेच्या काकडा आरतीने सुरुवात
दिल्लीतील आदिशक्ती 'मॉं झंडेवाली'च्या मंदिरात पहाटेच्या काकडा आरतीने सुरुवात झाली आहे. यावेळी मंदिरातील गणेशाला देखील पुजण्यात आले.
07:52 October 17
दिल्लीतील 'कालका जी' देवीच्या मंंदिरात भाविकांची गर्दी
नवी दिल्ली - आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. 'ईटीव्ही भारत' देशभरातील नवरात्रोत्सव तसेच महाराष्ट्रातील विविध शक्तीपीठांचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांसाठी आणत आहे.
- दिल्लीतील 'कालका जी' देवीच्या मंंदिरात भाविकांची गर्दी