पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रामविलास पासवान यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहत, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
रामविलास पासवान यांचे पार्थिव त्यांच्या घरी दाखल; पंतप्रधानांसह इतर नेत्यांनी घेतले अंत्यदर्शन
10:28 October 09
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांनी वाहिली श्रद्धांजली
10:23 October 09
केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी वाहिली श्रद्धांजली..
केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी रामविलास यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी पासवान यांच्यासोबतच्या जेपी चळवळीमधील आठवणींना उजाळा दिला. दलितांचे कैवारी म्हणून पासवानांची ओळख असल्याचे कुमार यांनी यावेळी म्हटले.
10:19 October 09
रामविलास पासवान यांचे पार्थिव त्यांच्या घरी दाखल; पंतप्रधानांसह इतर नेत्यांनी घेतले अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने नेते उपस्थित आहेत.