नवी दिल्ली -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पावसाळी अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी भारती आणि चीन यांमधील परिस्थितीचे विश्लेषण केले. मार्चपासून चीन भारताच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. यानंतर दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर तैनात करण्यात आले. अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध आहेत. अखेर रशियाच्या मॉस्को येथील बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बोलणी झाली.
पँगॉन्ग लेक तसेच चुशूल आणि लडाख प्रांतात चीनी चैन्याने केलेल्या घुसखोरीसंदर्भात राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. भारतीय सैन्य हे विषय हाताळण्यात सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चीनकडून झालेल्या घउसखोरीला सैन्याने जशास तसे उत्तर दिल्याचे त्यांनी म्हटले. पँगॉन्ग लेक च्या दक्षिणेकडील प्रांतात भारतीय सैन्याने उंचावरील भाग पुन्हा स्वत:च्या ताब्यात आणल्याची माहिती त्यांनी दिली.