महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान

काश्मीर
काश्मीर

By

Published : Nov 28, 2020, 1:24 PM IST

Updated : Nov 28, 2020, 7:37 PM IST

19:28 November 28

पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान झाले आहे. जम्मूमध्ये 64.2 तर काश्मीरमध्ये 40.65 टक्के मतदान झाले.

13:03 November 28

देशाच्या विकासासाठी घराबाहेर पडून मतदान करा, मतदारांचे नागरिकांना आवाहन

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीचा ग्राउंड रिपोर्ट

13:03 November 28

मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

13:01 November 28

अखनूरमधील भाजपच्या उमेदवार शारदा भाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

भाजपा उमेदवार

12:49 November 28

सकाळी 11 वाजेपर्यंत 22.12 टक्के मतदान

मतदानासाठी कडक बंदोबस्त

सकाळी 11 वाजेपर्यंत 22.12टक्के मतदान झाले आहे. अनुच्छेद 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यात पहिल्यांदा निवडणूक होत आहे. कोरोना, दहशतवाद यामध्येही राज्यात लोकशाहीचा उत्सव लोकांसाठी म्हत्त्वाचा असल्याचं पाहायला मिळत आहे. 

12:48 November 28

शोपियात इंटरनेट सेवा बंद

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीचा ग्राउंड रिपोर्ट

दक्षिण कश्मीरमधील शोपियात इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच पुलवामा आणि शोपिया यांना संवेदनशील भाग म्हणून घोषित केले आहे. श्रीनगरमधील हरवन मतदारसंघात मोठ्या संख्येने नागरिक मतदान करण्यासाठी पोहचले. 

12:48 November 28

2018 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पंचायत निवडणुकीसाठी झाले होते मतदान

यापूर्वी 2018 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यात 33 हजार 592 जागांवर 22 हजार 214 उमेदवारांनी आणि 4 हजार 290 सरपंचपदासाठी 3 हजार 459 उमेदवारांनी विजय मिळवला होता. काही जागा रिक्त राहिल्या होत्या. तिथे आता पोटनिवडणूक होत आहे. 43 जागांसाठी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान होईल.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक आयुक्तांनी केले आहे.  

12:47 November 28

8 टप्प्यात कधी-कधी मतदान

  • पहिला टप्पा  : 28 नोव्हेंबर
  • दुसरा टप्पा  : 01 डिसेंबर
  • तीसरा टप्पा  : 04 डिसेंबर
  • चौथा टप्पा  : 07 डिसेंबर
  • पाचवा टप्पा  : 10 डिसेंबर
  • सहावा टप्पा : 13 डिसेंबर
  • सातवा टप्पा : 16 डिसेंबर
  • आठवा टप्पा : 19 डिसेंबर

12:47 November 28

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान

काश्मीरमध्ये डीडीसी निवडणूक

श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यामध्ये 43 जागांसाठी एकूण 296 उमेदवार मैदानात आहेत. यातील 25 मतदारसंघ काश्मीर आणि 18 जम्मूमध्ये आहेत.  ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 1 हजार 179 उमेदवाराचे भाग्य आज ठरणार आहे. यात पंचायत समितीचे 899 आणि  ग्राम पंचायतीचे 280 उमेदवार रिंगणात आहेत.  

जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स पुल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढत आहे. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.  

Last Updated : Nov 28, 2020, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details