महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आगामी पिढ्यांसाठी राम मंदिर प्रेरणादायी ठरेल' - पंतप्रधान मोदी - राम मंदिर भूमिपूजन

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. रामनामाच्या गजराने आणि लखलखत्या विद्युत रोषणाईने अयोध्या नगरी सजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचाक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचीही उपस्थिती होती.

आज राम मंदिर भूमिपूजन ;पंतप्रधान मोदी लखनौत दाखल
आज राम मंदिर भूमिपूजन ;पंतप्रधान मोदी लखनौत दाखल

By

Published : Aug 5, 2020, 8:27 AM IST

Updated : Aug 5, 2020, 2:45 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचीही उपस्थिती होती. येणाऱ्या अनेक पिढ्यांना राम मंदिर प्रेरणादायी ठरेल. राम आमच्या मनामनात आहेत, असे यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

लाईव्ह अपडेट्स -

:०५ -सर्वांच्या अथक प्रयत्नांनी राम मंदिर बनणार आहे. राम आमच्या मनामनात आहेत. श्रीराम आजही आमच्या संस्कृतीचे आधार आहेत, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

२:०० -राम मंदिर हे आपल्या परंपरेचे आधुनिक प्रतिक बनेल, असेही मोदी म्हणाले. राम मंदिर येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही मोदी म्हणाले.

१:४५ -जय सियाराम ही घोषणा केवळ अयोध्येत नव्हे तर संपूर्ण जगात निनादली पाहिजे, असे यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले. मी याप्रसंगी सर्व श्रीराम भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. याप्रसंगी मला निमंत्रण देणे मी भाग्याचे समजतो. आज संपूर्ण देश रामनामाच्या गजरात न्हाऊन निघत आहे, असेही मोदी म्हणाले.

१:३० -राम मंदिर लवकरच उभे राहिल आणि यामुळे समस्त रामभक्तांची जुनी ईच्छा पूर्ण होईल, असे यावेळी बोलताना राम मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष नित्य गोपाल दास यांनी म्हटले आहे.

१:२० - 'ही नव्या भारताची नवी सुरुवात आहे', असे यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले.

१२:५० -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं संबोधन. शांतता, लोकशाही आणि संवैधानिकपणे कशाप्रकारे विषय हाताळता येतात, हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले, असे यावेळी बोलताना योगी यांनी सांगितले.

१२:४० -भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला.

१२:१४ -भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उपस्थिती.

१२:१० -पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम.

११:२० -पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले स्वागत.

११:०० - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अयोध्या येथे दाखल.

१०:४५ -बाबा रामदेव अयोध्या येथे दाखल. पतंजलीतर्फे अयोध्या येथे भव्य गुरुकूलची स्थापन करणार असल्याची बाबा रामदेव यांची घोषणा.

१०:३० - पंतप्रधान मोदी लखनौत दाखल. विशेष चॉपरने अयोध्येसाठी होणार रवाना.

१०:२०- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह उमा भारती अयोध्येत दाखल.

९:४५ -अयोध्येतील रामजन्मभूमी येथे रामलल्लाच्या मूर्तीची आकर्षक सजावट.

९:३४ - पंतप्रधान मोदी अयोध्येसाठी रवाना. वायूदलाच्या विशेष विमानाने पोहोचणार.

९:३० -नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात रांगोळी करून रोषणाई करण्यात आली.

Last Updated : Aug 5, 2020, 2:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details