नवी दिल्ली - भारातमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गर्भवती असलेल्या महिलांना प्रसुतीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर झारखंड सरकारने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील गर्भवती महिलांची यादी तयार केली आहे.
वैद्यकीय सुविधा पूरवण्यासाठी राज्यातील गर्भवती महिलांची यादी तयार - Jharkhand government
झारखंड सरकारने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील गर्भवती महिलांची यादी तयार केली आहे. तब्बल 51 हजार 935 महिलांची यादी आरोग्य विभागाने तयार करण्यात आली आहे.
तब्बल 51 हजार 935 महिलांची यादी आरोग्य विभागाने तयार करण्यात आली आहे. या सर्व महिलांची प्रसुती मे महिन्याच्या अखेरमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रोटोकॉलनुसार गर्भवती महिलांच्या वेळेवर प्रसूतीशी संबंधित सर्व वैद्यकीय सुविधा पुरविणे सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रधान सचिव (आरोग्य) नितीन मदन कुलकर्णी म्हणाले.
गेल्या 4 मेला सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांना इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेण्याची सूचना केली होती. कोरोना वगळता इतर रूग्णांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये ही रुग्णालयांची जबाबदारी आहे. दरम्यान डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना विषाणूविरोधात लढण्यातही व्यस्त आहेत.