नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या तळीरामांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने ४ मे नंतर देशाच्या ठरावीक भागांमधील दारुच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशानंतर, गेल्या ४० दिवसांपासून कोरडा असलेला तळीरामांचा घसा आता ओला होईल असे दिसत आहे.
..अखेर तळीरामांचा घसा होणार ओला; 'या' भागातील वाईन शॉप उघडण्यास सशर्त परवानगी - Liquor stores & paan shops will be allowed to function in green zones
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील ठरावीक भागांमध्ये वाईन आणि पान शॉप्स उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या चाळीस दिवसांपासून कोरडा असणारा तळीरामांचा घसा आता ओला होणार असे दिसत आहे.
अखेर तळीरामांचा घसा होणार ओला; 'या' भागातील वाईन शॉप उघडण्यास सशर्त परवानगी..
सरकारने वाईन शॉप्स उघडण्यासाठी काही अटी लागू केल्या आहेत..
- केवळ ग्रीन झोन मधील वाईन शॉप्स होणार सुरु..
- दोन ग्राहकांमध्ये ठेवावे लागणार सहा फूट अंतर..
- दुकानांबाहेर पाचपेक्षा अधिक ग्राहकांना परवानगी नाही..
- पानमसाल्यांची दुकानेही होणार सुरू..
Last Updated : May 1, 2020, 8:21 PM IST