महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पोलिसाची हत्या करणाऱ्या दारू माफियाचा एन्काऊंटर! उत्तर प्रदेशात रंगला थरार - कासगंज एन्काऊंटर

एडीजी अजय आनंद यांनी सांगितले, की मोतीराम आणि त्याच्या साथीदारांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. तसेच, या दोघांनाही झाडाला बांधून भाल्याने भोकसण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला, तर शिपायाचा मृत्यू झाला होता. एकूण सहा लोकांनी मिळून हे कृत्य केल्याची माहिती आनंद यांनी दिली.

kasganj case
पोलिसाची हत्या करणाऱ्या दारू माफियाचा एन्काऊंटर! उत्तर प्रदेशात रंगला थरार

By

Published : Feb 10, 2021, 7:00 PM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये घडलेल्या थरारक एन्काऊंटरमध्ये एका दारू माफियाला संपवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या माफियाने दोन पोलिसांना बेदम मारहाण केली होती. यामध्ये एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला होता.

काय आहे प्रकरण..?

सिढपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धीमर गावामध्ये दारु माफियांच्या कारवाया वाढत चालल्याचे पोलिसांना समजले होते. ज्यावर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी अशोक कुमार सिंह आणि पोलीस शिपाई देवेंद्र सिंह यांच्यावर दारू माफिया मोतीराम याच्या माणसांनी हल्ला केला होता. या दोन्ही पोलिसांना चक्क झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती. ज्यामध्ये अधिकारी मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. तर, शिपाई धर्मेंद्र याचा मृत्यू झाला होता. यानंतर आग्रा विभागाचे एजीडी अजय आनंद तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर तडकाफडकी पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आले. त्यानंतर दारू माफियांसोबत झालेल्या चकमकीत एलकार नावाच्या माफियाला ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि एलकारचा भाऊ मोतीराम मात्र पसार झाला. मोतीरामवर ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसाची हत्या करणाऱ्या दारू माफियाचा एन्काऊंटर! उत्तर प्रदेशात रंगला थरार

भाल्याने भोकसून केली होती हत्या..

एडीजी अजय आनंद यांनी सांगितले, की मोतीराम आणि त्याच्या साथीदारांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. तसेच, या दोघांनाही झाडाला बांधून भाल्याने भोकसण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला, तर शिपायाचा मृत्यू झाला होता. एकूण सहा लोकांनी मिळून हे कृत्य केल्याची माहिती आनंद यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर दोन्ही पोलीस कर्मचारी रक्तबंबाळ अवस्थेत एका खड्ड्यात पडलेले दिसून आले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी शिपाई धर्मेंद्र यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांना ५० लाखांची मदत..

यानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेतील आरोपींवर एएनएसच्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, यामध्ये आपला प्राण गमावलेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा :चार मुलांच्या हत्येनंतर वडिलांनी केली आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details