सुरत - कांदिवली येथे राहत असलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांना परत सोडण्यात आले आहे. माजी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ सूरत येथील युवराज पोखरना या युवकाने मातोश्रीवर लिपस्टिक पाठवल्या आहेत. शिवसैनिकांनी केलेली गुंडगिरी अत्यंत निंदनीय आहे, असे युवराज पोखरनाने म्हटलं आहे.
सोशल माध्यमांवर राजनैतिक पोस्ट का केली, असा जाब विचारत 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एका सेवानिवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात काल (शुक्रवार) रात्री 6 जणांना अटक केली होती. त्या सर्वांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.