मुंबई - भारताची प्रथम हॉस्पीटल ट्रेन ही गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल झाली. सन 1991 मध्ये सुरू करण्यात आलेली ही ट्रेन जगातील पहीली ट्रेन आहे. या ट्रेनला 'लाइफलाइन ट्रेन' तसेच 'जीवनरेखा एक्सप्रेस' या नावानेही ओळखले जाते. ही ट्रेन म्हणजे धावते रुग्णालय असून अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणांनी सज्ज असलेल्या या लाइफलाइन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील दुर्गम भागातील सुमारे 12 लाख रूग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
मुंबईत पोहोचली भारताची 'लाइफलाइन एक्सप्रेस'... - life line train
भारताची प्रथम हॉस्पीटल ट्रेन ही गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल झाली

लाइफलाइन एक्सप्रेस
लाइफलाइन एक्सप्रेसला मॅजिक ट्रेन ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. तर, इम्पैक्ट इंडिया फाउंडेशन, भारतीय रेल्वे आणि स्वास्थ्य मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हीला चालवले जाते. सध्यास्थितीत ही ट्रेन भारताव्यतिरिक्त चीन, मॅक्सिको सारख्या देशांमध्येही उपलब्ध आहे. या देशांत या ट्रेनला 'मॉर्डन हॉस्पीटल ट्रेन' नावाने ओळखले जाते.
Last Updated : Aug 30, 2019, 6:51 AM IST