महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये डौलाने फडकला तिरंगा, आर्टिकल ३७० हटवल्यानंतर पहिला प्रजासत्ताक दिन साजरा

जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल ३७० हटवल्यानंतर श्रीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाला पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये  डौलाने फडकला तिरंगा
जम्मू काश्मीरमध्ये  डौलाने फडकला तिरंगा जम्मू काश्मीरमध्ये  डौलाने फडकला तिरंगा

By

Published : Jan 26, 2020, 4:24 PM IST

Updated : Jan 26, 2020, 5:06 PM IST

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल ३७० हटवल्यानंतर श्रीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाला पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कलम 370 हटवण्यात आल्यामुळ खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर भारताशी जोडले गेले आहे. काश्मीरमधील आर्थिक आणि कायदेशीर समस्या हळूहळू मार्गी लागत आहेत, असे गिरीश चंद्र मुर्मू म्हणाले. जम्मू काश्मीरचा चित्ररथ राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात पाहायला मिळाला आहे. दिल्लीतील राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रजासत्ताक दिनाला ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो उपस्थित राहिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख अतिथी ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो हे राजपथवर उपस्थित आहेत. तिन्ही सेनादलांकडून राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली.
Last Updated : Jan 26, 2020, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details