नवी दिल्ली - केंद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज मुकुंद नरवणे हे 28 वे लष्कर प्रमुख असणार आहेत. नरावणे 31 डिसेंबरला लष्कर प्रमुखपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
1 सप्टेंबरला लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला होता. आज ते पुढचे लष्कर प्रमुख असणार असल्याची जाहिर झाले आहे. सध्या लष्करप्रमुख असलेले जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
मनोज मुकुंद नरवणे मराठमोळे असून मूळचे पुण्यामधील आहेत. नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ मध्ये झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने गौरव झाला आहे.आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
या पदाची सांभाळली धुरा-
- सेकन्ड लेफ्टनंट -७ जुन १९८०
- लेफ्टनंट -७ जुन १९८२
- कॅप्टन - ७ जुन १९८५
- मेजर -७ जुन १९९५
- लेफ्टनंट कर्नल -३१ डिसेंबर २००२
- कर्नल- १ फेब्रुवारी २००५
- ब्रिगेडियर - १९ जुलै २०१०
- मेजर जनरल -१ जानेवारी २०१३
- लेफ्टनंट जनरल - १० नोव्हेबंर २०१५
- लष्कर उपप्रमुख - 1 सप्टेंबर 2019