⦁ भारतीयांकडून घेतल्या जात असलेल्या वस्तूंच्या उपभोगाचा आलेख पाहिला असता, भारतीय वेगाने बदलत असल्याचे लक्षात येईल. यावरून देशातील उपभोक्तावादाची पकड वाढल्याचे लक्षात येईल.
⦁ अशी स्थिती ग्रामीण आणि शहरी भाग अशा दोहोंमध्येही आहे.
⦁ लोकांच्या प्राप्तीमध्ये झालेली वाढ हे यामागचे एक कारण असू शकते.
⦁ 'पावळ्यासाठी साठवून ठेवणे' ही संकल्पना काहीशी जुनाट ठरू पाहात आहे.
⦁ जागतिक अर्थ मंचाच्या मते, भारतीय ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण २०३० पर्यंत चौपटीने वाढणार आहे.
⦁ आणखी १४ कोटी कुटुंबे २०३० पर्यंत मध्यम उत्पन्न गटात येतील. तसेच, आणखी २ कोटी कुटुंबे उच्च उत्पन्न गटात जातील.
⦁ या कुटुंबांकडून अन्न, पेये, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहतूक आणि घर खरेदीसाठी होणारा खर्च दुपटीने ते अडीचपटीने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचा आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, घरगुती गरजेच्या वस्तू खरेदी यावरील खर्चही तीने ते चार पटींनी वाढणार आहे. धुलाई यंत्रे, रेफ्रिजरेटर्स, टीव्ही आणि वैयक्तिक वाहन खरेदी यावर उच्च मध्यम वर्ग आणि उच्च उत्पन्न गट यांच्याकडून केल्या जाणाऱ्या खर्चात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होणार आहे.
तरुणांचा प्राधान्यक्रम
'मिलेनियल्स' आणि 'झेड' पिढीच्या प्राथमिकता भारताच्या ग्राहकपेठेचे चित्रच पूर्णपणे बदलून टाकतील.
२०३० पर्यंत भारताच्या लोकसंख्येच्या जवळजवळ ७७ टक्के लोक हे १९८० नंतर जन्माला आलेले असतील.
या पिढीत जन्माला आलेले ग्राहक त्यांच्या मागील पिढीतील ग्राहकांच्या तुलनेत वस्तू आणि सेवांच्या अधिक वापराला प्राधान्य देतील. ते दर्जेदार वस्तू खरेदी करण्यावर भर देतील. यामुळे हे लोक कौटुंबिक गरजांचा विचार करून वस्तू खरेदी करण्याविषयी जागरूक असल्याने ग्राहक पेठेत सकारात्मक बदल दिसून येतील.
उत्पन्नाच्या पातळीत वाढ
मध्यम आणि उच्च उत्पन्न गटात जलद होणारी वाढ हे ग्राहक पेठेच्या विस्ताराचे प्रमुख कारण असणार आहे. या घडीला प्रत्येक चारपैकी एक कुटुंब या श्रेणीत आहे. २०३० पर्यंत प्रत्येक दोनपैकी एक कुटुंब या गटात असेल.
सुमार उत्पन्न गटातील लोकांच्या आवडी-निवडीही झपाट्याने बदलत आहेत. पुढील एका दशकात कोट्यवधी तरूण प्रथमच उपभोक्ते बनतील. हे चौथ्या औद्योगिक क्रांतीशी जोडले गेलेले आहे.
मध्यम वर्ग भारतावर राज्य करेल
२०३० पर्यंत भारत ही मध्यम वर्गाचे वर्चस्व असलेली अर्थव्यवस्था बनलेली असेल.
पुढील ११ वर्षांत देशातील जवळजवळ ८० टक्के कुटुंबे मध्यम वर्गीय असतील.