'संसदेने एकमताने परवानगी दिली असल्याने आपण सर्वजण मिळून पाकव्याप्त काश्मीरला मुक्त करू आणि भारताशी जोडू. आपण सर्वजण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची प्रार्थना करू की, हा क्षण पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभावे,' असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
'पाकव्याप्त काश्मीर' मुक्त करून भारताला जोडू - जितेंद्र सिंह
'आपण सर्वजण मिळून पाकव्याप्त काश्मीरला मुक्त करू आणि भारताशी जोडू. आपण सर्वजण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची प्रार्थना करू की, हा क्षण पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभावे,' असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
जितेंद्र सिंह
श्रीनगर - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याविषयी वक्तव्य केले होते. 'आता पाकिस्तानशी फक्त पाकव्याप्त काश्मीरविषयीच चर्चा होऊ शकते,' असे त्यांनी म्हटले होते. त्यानतंर आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही अशाच भावना व्यक्त करत राजनाथ यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. 'पाकव्याप्त काश्मीर' मुक्त करून भारताला जोडू,' असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
राजनाथ सिंह यांनी हरियाणा येथे बोलताना याआधीच पुढील धोरण स्पष्ट केले होते. त्यांनी 'आता फक्त पाकव्याप्त काश्मीरविषयीच पाकशी चर्चा होऊ शकते,' असे म्हटले होते.
'चर्चा का करावी? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करावी? पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय देणे बंद केल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. चर्चा सुरू झालीच तर, ती केवळ पाकव्याप्त काश्मीरविषयीच असेल. इतर कोणत्याही मुद्द्यावर नाही,' असे जितेंद्र सिंह म्हणाले.