महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

थरारक! शेतातील तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका; दोन वनाधिकारी जखमी - बिबट्या न्यूज

राजुपेट तांडा येथील येथील शेतकऱ्याने पिकांचे उपद्रवी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण घातले होते. मात्र, बिबट्या कुंपणात अडकला. ही घटना समजताच परिसरातील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली.

बिबट्या हल्ला करताना
बिबट्या हल्ला करताना

By

Published : May 28, 2020, 7:24 PM IST

Updated : May 28, 2020, 7:35 PM IST

हैदराबाद- बिबट्याला पाहताच कुणाचीही बोबडी वळेल... असा बिबट्या नलगोंडा जिल्ह्यातील राजुपेट तांडा येथील तारेच्या संरक्षण कुंपणात अडकल्याची घटना घडली. या बिबट्याची वनाधिकाऱ्यांनी सुखरुप सुटका केली. मात्र, यावेळी दोन वनाधिकारी जखमी झाले आहेत.

येथील येथील शेतकऱ्याने पिकांचे उपद्रवी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण घातले होते. मात्र, बिबट्या अचानक कुंपणात अडकला. ही घटना समजताच परिसरातील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली.

शेतातील तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका

हेही वाचा-'इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठी संधी'

बिबट्या तारेच्या कुंपण्यात अडकल्याची माहिती होताच वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. तब्बल दोन तासानंतर त्यांनी अखेर बिबट्याची कुंपणातून सुटका केली. बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करताना वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी बिबट्याने अचानक हल्ला चढविल्याने दोन अधिकारी जखमी झाले आहेत.

हेही वाचा-कोल्हापूरमध्ये शेतात काम करत असताना सापडला पुरातन खजिना

टाळेबंदी आणि कोरोनाचे संकट असले तरी अनेक सरकारी अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर रुजू आहेत. बिबट्याची कुंपणामधून सुटका केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Last Updated : May 28, 2020, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details