महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By

Published : Feb 7, 2020, 10:38 PM IST

Updated : Feb 8, 2020, 12:19 AM IST

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होणार आहे. दिल्लीतील मतदार आज आपला मताधिकार बजाविणार आहेत. मतदानासाठी दिल्लीमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

सुमारे 1 कोटी 47 लाखांहून अधिक मतदारांचे मतदान पार पाडण्यासाठी 13,750 मतदान केंद्र आणि 90,000 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली आहे. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये शारीरिक किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे गैरहजर असणाऱ्या मतदारांसाठी विशेष सोय केली जाणार आहे. अपंग आणि 80 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदान सुरक्षीत पार पडावे, यासाठी सीआरपीएफच्या १९० तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे १९ हजार जवान तैनात केले आहेत. सुधारणा नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असलेल्या शाहीन बागेत देखील ५ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

विधानसभेच्या 2015 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला खाते उघडता आले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसला 9.7 टक्के मिळाली. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सात पैकी पाच मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत विजयाची आशा आहे. मात्र, मुख्य संघर्ष भाजप आणि आप या पक्षांमध्ये असल्याचे दिसून येते.

दिल्लीचे सरकार चालवण्यासाठी दिल्लीकर मतदारांचा आप हा पसंतीचा पक्ष राहिला आहे. २०१३ मध्ये आपली पहिलीवहिली विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या 'आप'ला जागांचे बहुमत मिळवता आले नाही. त्याने २९.५ टक्के मतांच्या टक्केवारीसह २८ जागा जिंकल्या. पण त्यानंतर जवळपास वर्षभरातच २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७० विधानसभा जागांपैकी ६७ जागा जिंकून प्रचंड बहुमत नोंदवले. त्यांच्या मतांची टक्केवारी ५४.३ टक्के होती.

Last Updated : Feb 8, 2020, 12:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details