भुवनेश्वर - मातृभाषा ही सर्वात महत्त्वाची असते, कारण ती आईच्या गर्भातून येते. त्यामुळे आपण इतर कोणती भाषा शिकण्याआधी आपली मातृभाषा शिकण्यावर आणि त्याच्या प्रसारावर भर द्यायला हवा, असे मत भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ओडिशामध्ये एका ओडिया भाषेतील दैनिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदी, बंगाली, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, कन्नड किंवा फ्रेंच, चीनी कोणतीही भाषा शिकावी मात्र, त्याआधी आपल्या मातृभाषेचे संवर्धन करावे हे गरजेचे आहे. त्यासाठीच मी नेहमी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावे, असे म्हणण्यावर भर देतो, असेही नायडू यावेळी म्हणाले.