नवी दिल्ली - चंद्रापासून फक्त 2.1 किमी अंतरावर लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटला. शास्त्रज्ञांनी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होप फॉर द बेस्ट म्हणत शास्त्रज्ञांना बळ दिलं.
लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटल्याने काही काळ शास्त्रज्ञांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अनेकांनी ट्वीटरच्या माध्यमातून वैज्ञानिकांना बळ दिलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
इस्रोच्या संपूर्ण टीमने चांद्रयान - २ च्या मोहिमते धाडस दाखवले आहे. इस्रोच्या संपूर्ण टीमचा देशाला अभिमान असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी
आपले समर्पण प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा देणारे असल्याचे म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी ट्वीटरच्या माध्यमातून धीर दिला. तसेच तुमचे काम व्यर्थ जाणार नाही. आगामी महत्वाकांक्षी भारतीय अंतराळ मोहिमेचा पाया रचला असल्याचे ते म्हणाले.
अमित शाह
आत्तापर्यंत चांद्रयाण- २ ला मिळालेल्या यशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले. देश सातत्याने कठिण परिश्रम घेणाऱ्या वैज्ञानिकांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. भविष्यातील प्रयत्नासाठी शाह यांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या.
आनंद महिंद्रा
चांद्रयानाशी संपर्क तुटलेला नाही. प्रत्येक भारतीय चांद्रयानच्या हदयाचे ठोके ऐकत आहे. जर आपण पहिल्यांदा अयशस्वी झाला असाल तर पुन्हा प्रयत्न करा असं चांद्रयान प्रत्येक भारतीयांच्या कानात कुजबुजत आहे.
अरविंद केजरीवाल
आमच्या शास्त्रज्ञांनी एक चांगले काम केले असून, आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्ते केले. तसेच हार मानण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.