नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर न्यायालयाने त्यांच्या वेस्टर्न टॉयलेट, घरचे जेवण आणि औषधी या सोयी देण्याचे मान्य केले आहे.
INX मीडिया खटला : चिंदबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरण
काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मंगळवारी विशेष न्यायलयाने ईडीच्या अधिकाऱ्यांना मनी लाँड्रींग खटल्याप्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. बुधवारी तिहार तुरुंगामध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांची चौकशी केली होती.
पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.