नवी दिल्ली -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु केलेले काम 1 जुलै पासून बंद करून पूर्ववत न्यायालयातून खटले सुनावणीचे काम सुरू करावे, अशी मागणी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. 'सुप्रिम कोर्ट अॅडव्हॉकेट ऑन रेकॉर्ड असोशिएशन' संघटनने सरन्यायाधीश एस.ए बोबडे आणि इतर न्यायाधिशांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाईन सुनवाणीत येत असलेल्या अडचणींचीही माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली.
न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरु करा, वकिलांची सर्वोच न्यायालयाकडे मागणी - सर्वोच्च न्यायालय कामकाज बातमी
'सुप्रिम कोर्ट अॅडव्हॉकेट ऑन रेकॉर्ड असोशिएशन' संघटनने सरन्यायाधीश एस.ए बोबडे आणि इतर न्यायाधीशांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाईन सुनावणीत येत असलेल्या अडचणींचीही माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली.
कोरोनाचा भारतात प्रसार वाढल्यानंतर 25 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज बंद आहे. सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटले सुनावणीला घेण्यात येत आहेत. बार असोशिएशनच्या 95 टक्के वकिलांना ऑनलाईन सुनावणी घेताना अडचणी येत असल्याचे पत्रात संघटनेने म्हटले आहे.
वकिलांकडून आलेल्या सर्वसामन्य प्रतिक्रियांतून खटला व्हिडिओ कॉन्फसन्सिंगद्वारे प्रभावीपणे मांडता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वकील आणि संघटनेच्या वतीने मी पत्र लिहित असून 1 जुलैपासून न्यायालयातील कामकाज पूर्ववत पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.